Take a fresh look at your lifestyle.

आयुष्यात कधीही पैशांची कमी भासणार नाही; फक्त ‘या’ चुका टाळल्या पाहिजेत

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : आर्थिक उद्दीष्टे साध्य करण्यासाठी, मालमत्ता तयार करण्यासाठी किंवा कर्जमुक्त राहण्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे बचत. भविष्यासाठी बचत करणे आज खूप महत्त्वाचे झाले आहे. जीवनात कधीही आपत्ती येण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातून बचत करावी. काही सामान्य चुका आहेत, ज्या तुमच्या बचतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतात. प्रत्येकाने या चुका टाळल्या पाहिजेत.

बचत तेव्हाच होते जेव्हा तुम्ही कमावलेल्या रकमेपेक्षा कमी खर्च करता. आपल्यापैकी बरेच जण बचत करतात. तथापि, काही वेळा आपण अशा चुका करतो की, ज्यामुळे आपल्या बचतीवर परिणाम होतो. त्यामुळे आर्थिक अडचणीही निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुका सांगणार आहोत, ज्या प्रत्येकाने टाळणे आवश्यक आहे.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? ‘ते’ पुस्तक कोणते?

आधी खर्च करू नका

सर्वप्रथम तुमच्या कमाईतून बचत काढा. मग जे उरले ते खर्च करा. जर तुम्ही खर्च करायला सुरुवात केली, तर तुमच्याकडे काही उरणार नाही. त्यामुळे, तुम्ही आधी कमाईचा काही भाग बचत म्हणून बाजूला ठेवणे महत्त्वाचे आहे.

यादीशिवाय खरेदी करू नये

जेव्हाही खरेदीला जाल, त्यापूर्वी यादी तयार करून घ्या. कारण, आवश्यक वस्तू खरेदी करण्यास विसरणार नाही आणि कोणतीही अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापासून वाचू शकतो. आवश्यक आहे तेच खरेदी करा.

बँकेत FD करताना ‘या’ गोष्टींचा विचार नक्की करा; नाही तर तोटा होण्याची शक्यता

उत्पन्न वाढल्यास, खर्च वाढवू नका

काही लोक उत्पन्नात वाढ होत नसली तरी जास्त खर्च करू लागतात. याचा आपल्या बचतीवर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे उत्पन्न वाढ होईपर्यंत खर्च वाढवू नका. तसेच, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे केल्यास बचतीवर कोणताही परिणाम होणार नाही. भविष्यात तुमच्याकडे चांगले पैसे जमा होतील.

बजेट बनवायला कधीही विसरू नका

जसा देशाचा अर्थसंकल्प मांडला जातो, तसाच घरचा अर्थसंकल्पही तयार करावा. आपल्या घरासाठी तयार केलेल्या बजेटमध्ये एकूण उत्पन्न आणि खर्चाचा समावेश असावा. बजेट बनवताना काळजी घेतली पाहिजे आणि खर्च चांगले ओळखले पाहिजेत. तसेच, बजेट तयार करताना, आपण आवश्यक नसलेले काहीतरी खर्च करत आहात का? हे बघायला हवे. आणि आता काय टाळता येईल, हे पाहणे गरजेचे आहे. बजेट बनवताना भविष्यासाठी किती बचत करायची हेही ठरवायला हवे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.