Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र सरकारच्या चूकीच्या धोरणाचा राष्ट्रवादीकडून निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

बुलढाणा : शिंदे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निषेध करून तहसीलदार संग्रामपूर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना १६ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्रच्या आर्थिक उन्नतीसाठी युवकांना रोजगारासाठी राज्याच्या प्रगतिसाठी सेमीकंडक्टर व डिस्प्ले फॅब्रीकेशनचा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाची भूमिका तसेच राज्यातील जनतेची विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सूचित केली आहे. सध्याचे मोठमोठे प्रकल्प जसे वेदांत (फाक्सकॉन) सारखे लाखो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प शिंदे सरकारच्या काळात दिवसाढवळ्या गुजरातसारख्या राज्यात पळून नेण्यात येत आहेत.

अंबदास दानवे यांचा सत्कार सोहळा; असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती

केंद्र सरकारच्या दबावात मुख्यमंत्री काम करत असून लाखो लोकांना रोजगार देणारे प्रकल्प जर राज्याबाहेर गेले, तर राज्याचे फार मोठे नुकसान होणार आहे. शासनाचे चुकीचे धोरण यासाठी कारणीभूत आहे. यामुळे अशाप्रकारे मुंबईसह महाराष्ट्र राज्याचे महत्त्व कमी होत आहे. शासनाचे भैसाळ नियोजनशून्य कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येवून भविष्यात असेच प्रकार घडत राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

ताई तुम्ही अजून एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत

निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संग्रामपुर तालुकाध्यक्ष संजय पाटील मारोडे तालुका कार्याध्यक्ष अरुण निंबोळकार, युवक तालुकाध्यक्ष अमोल व्यवहारे, युवक तालुका कार्याध्यक्ष सोपान रावणकार, राजेंद्र पाटील दाभाडे, प्रशांत भरडक, पप्पू पठाण, अंकुश कड, नारायण ढंगे, दुर्गासिंग सोळंके, तुकाराम घाटे, बाळू साबे, अमित वर्गे, अभिनव रावणकार, रोशन पाटील मारोडे, संतोष नायसे, सुरेश साबे, अरुण मुरुख, पंजाबराव पाटील, सुनील खरात, प्रमोद सोळंके यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.