Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रपती निवडीचा आनंद, आदिवासी महिलेची लाडूतुला

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

चिखली(बुलढाणा) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आदरणीय श्रीमती द्रौपदीजी मूर्मू यांची भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर प्रचंड बहुमताने निवड झाली आणि हरणी (ता. चिखली) या आदिवासी बहुल गावात कौशल्याबाई जाधव या आदिवासी वयोवृद्ध महिलेची लाडूतुला करून हा आनंद साजरा करण्यात आला.

अकोल्यात द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष

समाजासाठी समर्पित वृत्तीने काम करणा-या आदरणीय श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या अभिनंदन सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले याचा विलक्षण आनंद होत आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी प्रथमच एका आदिवासी महिलेला मिळालेली संधी हा ख-या अर्थाने नारीशक्तीचा सन्मान आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

३८ शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार वितरीत; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

या सोहळ्यास डॉ. प्रतापसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजप, डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, शेख अनिस भाई जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी, डॉ. उद्धव देवकर, डॉ. गट्टाणी, प्रा. वीरेंद्र वानखेडे, पंडीत दादा देशमुख, गोविंद देव्हडे, सुभाषअप्पा झगडे, विजय वाळेकर, सिंधुताई तायडे, भोसले ताई, संगीताताई दुधाळे, संजय महाले, जितेंद्र कलंत्री, संजय महाले, दिगंबर राऊत, शिवनारायण नखोद, विजय नकवल, संतोष काळे, बंडू अंभोरे, प्रशांत पाखरे, अशोक लाहुडकर, महादेव ठाकरे, वासुदेव राजपूत, भास्कर आढळकर, सचिन गराड, सुदर्शन खरात, भारत शेळके, अमोल साठे, नंदू भाऊ धवने, गजू देशमुख, बबनराव राउत, डॉ. उदय राजपूत, भीमराव अंभोर, अशोक हतागळे, राजु राठी, देविदास जाधव, बंडू बिडवे, महादेव ठाकरे, दिगंबर राऊत, दिगंबर ठाकरे, अमोल साठे, संतोष जराड, शिवा वाघ, प्रदीप नसवाले इत्यादी उपस्थित होते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.