एका रिचार्जमध्ये चालणार अनेकांचे फोन, Jio खास ऑफर, किंमत एवढीच

0

Jio प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लॅन ऑफर करते. याशिवाय टेलिकॉम ऑपरेटर्स काही खास ऑफर्सही देतात. अशीच एक ऑफर म्हणजे फॅमिली प्लॅन. या प्रकारच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्स एकापेक्षा जास्त कनेक्शन वापरू शकतात. दोन्ही कनेक्शनवर तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि इतर बेनिफिट्स मिळत राहतील. जाणून घेऊया त्याचा तपशील.

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लॅन मिळतात. कंपनी अनेक प्रकारचे स्वस्त महागडे प्लॅन ऑफर करते. जर तुम्ही जिओ पोस्टपेड युजर असाल तर तुम्हाला कंपनीच्या एका खास ऑफरचा फायदा मिळू शकतो. जिओ फॅमिली रिचार्ज प्लॅनबद्दल आपण बोलत आहोत.म्हणजेच एका रिचार्जमध्ये अनेकांचे फोन चालू शकतात.

कंपनी असे अनेक प्लॅन्स ऑफर करते. यामध्ये तुम्हाला दोन युजर्सपासून ते चार युजर्सपर्यंतचे प्लॅन मिळतात. जिओचा पोस्टपेड प्लॅन 399 रुपयांपासून सुरू होतो, पण फॅमिली प्लॅनसाठी तुम्हाला कमीत कमी 599 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये मुख्य युजरव्यतिरिक्त दुसऱ्या युजरचे सिम अॅक्टिव्ह असणार आहे. चला जाणून घेऊया या योजनेचा तपशील.

दोन जणांचा फोन काम करेल


याला तुम्ही जिओचा सर्वात स्वस्त फॅमिली प्लॅन देखील म्हणू शकता. यामध्ये युजर्संना प्रत्येक बिलिंग सायकलसाठी १०० जीबी डेटा मिळतो. डेटा ची मर्यादा संपल्यानंतर युजर्सला प्रति जीबी 10 रुपये खर्च करावे लागतील. जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळते.

म्हणजेच तुमचा संपूर्ण डेटा तुम्ही नंतर वापरू शकता. जिओ प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. इतकेच नाही तर युजर्संना जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळणार आहे.

कंपनी या रिचार्ज प्लॅनसोबत नेटफ्लिक्स मोबाइल सब्सक्रिप्शन देखील देत आहे. याशिवाय युजर्संना एक वर्षासाठी अॅमेझॉन प्राईमचं सब्सक्रिप्शनही मिळतं.

दोनपेक्षा जास्त लोक फोन वापरतील.


जर तुम्हाला तीन लोकांसाठी प्लॅन हवा असेल तर तुम्ही 799 रुपयांचे रिचार्ज निवडू शकता. यामध्ये पूर्ण वैधतेसाठी १५० जीबी डेटा मिळतो. यामध्ये मुख्य वापरकर्ता एकाच वेळी दोन अतिरिक्त ग्राहक जोडू शकतो.

जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. यामध्ये युजर्संना ओटीटी प्लॅनचे सब्सक्रिप्शनही मिळते. चार युजर्ससाठी जिओचा फॅमिली प्लॅन ९ रुपयांना येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.