Take a fresh look at your lifestyle.

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ तीन स्कीममध्ये पैसे गुंतवा आणि मिळवा मोठा परतावा

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : आजच्या युगात गुंतवणूक करणं गरजेचं बनलं आहे. तुम्ही आज केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात कधी मदत करेल, हे सांगता येत नाही. जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा विचार डोक्यात येतो तेव्हा अनेक पर्याय समोर उभे राहतात. काही गुंतवणुकीत जास्त जोखीम असते तर काही गुंतवणुकीत कमी जोखीम असते. परंतु पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे खूपच सुरक्षित मानले जाते. जर तुम्हीही पैसे वाचवण्यासाठी सरकारी योजना शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला पैशाच्या सुरक्षिततेसह चांगल्या व्याजाचा लाभ मिळत असेल, तर आम्ही तुम्हाला अशा तीन सरकारी योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला जास्त व्याजाचा लाभ मिळतो.

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या; गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली हत्येची जबाबदारी

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. यात तुम्हाला वार्षिक ७.१ टक्के व्याजदर मिळतो. या योजनेचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सवलत मिळते. या योजनेसह, तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये गुंतवू शकता. तसेच मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवू शकता.

ही योजना गुंतवणूकदारांना वार्षिक ७.६ टक्के व्याजदर देते. तुम्ही किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये प्रतिवर्ष गुंतवू शकता. या योजनेअंतर्गत ० ते १० वयोगटातील मुलीसाठी खाते उघडता येते. मुलगी १८ वर्षांनंतर आंशिक तर २१ वर्षांनंतर संपूर्ण रक्कम खात्यातून काढू शकते.

आपत्ती निवारणासाठी सज्ज रहावे; उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांचे निर्देश

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना पीएफ नंतर सर्वाधिक व्याज दर देते. या योजनामध्ये तुम्हाला ७.४ टक्के व्याजदर मिळतो. या योजनेत तुम्ही ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. त्यानंतर, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ही योजना आणखी ३ वर्षांसाठी वाढवू शकता. याव्यतिरिक्त, ही योजना गुंतवणूकदाराला खाते वेळेपूर्वी बंद करण्याची सुविधा देते.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूकदार किमान ००० आणि कमाल १५ लाख गुंतवू शकतात. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना योजनेत गुंतवणूक करून आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सवलक मिळते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.