Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गुरुवारी संध्याकाळी मराठा आरक्षणाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यापूर्वी १४ ऑगस्ट २०२२ रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीसाठी मुंबईत येत असताना शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती. १२ संघटना आणि ५० मराठा समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीराजे भोसले या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यावर मराठा मंत्रीमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद सोपवण्याचा मोठा निर्णय घेतला जावू शकतो .

डॉ. संगीता बर्वे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

या अगोदर अशोक चव्हाणांकडे हे अध्यक्षपद होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.ओबीसींपाठोपाठ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नव्या शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. नारायण राणे यांच्या नेतृत्वात सुरूवातीला हा लढा उभारला गेला. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टातला संघर्ष सुरू झाला. मात्र गेले अनेक वर्षे प्रयत्न करूनही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारला अपयश आलं आहे. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघताना दिसत असताना मराठा समजालाही आरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 👇

Leave A Reply

Your email address will not be published.