Take a fresh look at your lifestyle.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? ‘ते’ पुस्तक कोणते?

ओटीटी न्यूज नेटवर्क

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही अमेरिकेची ओळख आहे. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेऊन असलेली ही स्वातंत्र्यदेवता अमेरिकेत युरोपमार्गे समुद्राच्या मार्गाने येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करते. नायगरा फॉल्स, हॉलिवूड, माऊंट रशमोर यांच्याबरोबरच स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आजही अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.

गेल्या १३६ वर्षापासून हा पुतळा अमेरिकेत मोठ्या मानाने उभा आहे. तुम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे अनेक फोटो पाहिले असतील किंवा अनेक चित्रपटांमध्ये ही विशाल मूर्ती पाहिली असेल. पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या हातात नेमके कोणते पुस्तक आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याविषयी आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या इतर बाबींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऑन धीस टाईम मीडियाची ही बातमी नक्की वाचा…

बेंगलोर येथील राष्ट्रीय प्रौढ जलतरण स्पर्धेत नागपूरच्या महिला जलतरणपटूचे उत्कृष्ट प्रदर्शन

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा अमेरिकेने स्वतः बनवलेला नाही. बऱ्याच जणांना असे वाटते की, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा अमेरिकेचा आहे. म्हणजे त्यांनी स्वतः बनवून घेतला असावा. मात्र, तसे नाही. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी १८८६ ला अमेरिकेच्या स्वातंत्र्यानिमित्ताने फ्रान्सने ही मूर्ती भेट दिली. याची निर्मिती फ्रान्स आणि अमेरिका दोन्ही देशांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती. यासाठी अमेरिका आणि फ्रान्स सरकारमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार अमेरिकेने या मूर्तीचा पाया उभारला तर फ्रान्सने मूर्तीची निर्मिती केली.

जेव्हा ही मूर्ती तयार होऊन उभी करण्यात आली, त्यावेळी ही लोखंडाची सर्वांत मोठी रचना होती. फ्रान्सकडून अमेरिकेला भेट देण्यात आलेल्या या तांब्याच्या मूर्तीचे डिझाइन फ्रान्सचे मूर्तिकार फ्रेडरिक ऑगस्ट बार्थोल्दी यांनी तयार केले. तर ही मूर्ती गुस्ताव एफिलने तयार केली. २८ ऑक्टोबर १८८६ साली तत्कालीन राष्ट्रपती ग्रोवर क्लीवलैंड यांनी हजारो लोकांसमोर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे अनावरण केले.

माळी समाजाचे राज्यात महासंपर्क अभियान; अविनाश ठाकरेंचा पुनरुच्चार; म्हणाले…

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे एकूण वजन २२५ टन इतके आहे. १९८६ मध्ये डागडुजी करताना नव्या मशालीला २४ कॅरेट सोन्याचा मुलामा लावण्यात आला होता. या मूर्तीच्या मुकूटावर सात किरण आहेत. जे जगातल्या सात महाद्वीपांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक किरणांची लांबी ९ फूट आहे आणि त्याचे वजन १५० पाउंड आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या डोक्यापर्यंत जायचे असेल तर तब्बल ३५४ पायऱ्या चढून जावे लागते. मूर्तीच्या आतून मुकूटापर्यंत जाण्यासाठीही रस्ता आहे. या मूर्तीच्या एका हातात जळती मशाल तर दुसऱ्या हातात पुस्तक आहे.

या स्वातंत्र्यदेवतेच्या मुर्तीच्या उजव्या हातातील ज्योत स्वातंत्र्याचा प्रकाश दर्शवते, तर डाव्या हातातील पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हे पुस्तक २३ फूट ७ इंच लांब आणि १३ फूट ७ इंच रूंद आहे. यावर JULY IV MDCCLXXVI असे लिहिले आहे. हे ४ जुलै १७७६ ही तारीख दर्शवते. त्यामुळे या मूर्तीला अमेरिकेच्या स्वतंत्रता दिनाच्या दिवशी जगभरातील लोक मोठ्या संख्येने लोक भेट देतात.

खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा महोत्सव महत्त्वाचे; ऑलिम्पियन गोपाल सैनी यांचे प्रतिपादन

या देवतेच्या डाव्या हातात जे पुस्तक दिसते ते पुस्तक नसून टॅबलेट असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. या टॅबलेटचे नाव tabula ansata म्हणजे कायद्याची सुरुवात करणारे टॅबलेट होय. या टॅबलेटचा आकार एखाद्या कीस्टोनसारखा आहे. अमेरिकेतील सगळ्या नागरिकांसाठी सारखाच कायदा आहे. अमेरिकेत लोकशाही आहे आणि याचाच अर्थ की अमेरिकेत सर्वांना स्वातंत्र्य आहे, असा त्यातून संदेश दिला जातो. हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. म्हणजेच ते पुस्तक ज्याला काही लोक टॅबलेट म्हणतात, ते अमेरिकेतील सामान नागरी कायद्याचे प्रतीक आहे. ते समानतेचे आणि न्यायाचे प्रतीक आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.