Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचा पुन्हा थैमान! उत्तर कोरियात दोन लाख जणांना संसर्ग

ओटीटी न्यूज नेटवर्क

प्याँगयाँग : उत्तर कोरियात युद्धपातळीवर कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. उत्तर कोरियामध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३२ हजार ८८० रुग्ण आढळले आहेत. कोरोना रोखण्यासाठी आरोग्य सेवेच्या कामात तीन हजार सैनिकांचा सहभाग होता. या सैनिकांकडून औषधांचा पुरवठा केला जात आहे. कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत. देशाच्या दुर्गम भागातही औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवला पाहिजे, असे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी म्हटले आहे.

राजीव गांधींचा मारेकरी तुरुंगातून बाहेर येणार; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कोरानामुळे देशभरातील १४ लाख २८ हजार लोकांना आपत्कालीन सेवेवर पाठवले आहे. यामध्ये सरकारी अधिकारी, शिक्षक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय काही स्वयंसेवकांवरही ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर कोरियामध्ये १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १० लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता १७ लाख १५ हजार ९५० झाली असून त्यापैकी १० लाख २४ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ५ हजार ६३० रुग्ण बरे झाले आहेत.

बापरे! राज्यात उन्हाची तीव्रता वाढली; उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० तर २९ जणांचा मृत्यू

कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कमांड सिस्टम विकसित करण्यात आली आहे. देशभरात कोरोनाच्या घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी लोकांना एकाकी ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर तसेच अतिरिक्त वाहतुकीचा सल्ला दिला आहे. देशभरात सुमारे ५०० रॅपिड मोबाईल अँटी-एपिडेमिक गट स्थापन करण्यात आले आहेत. हे गट कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

मोठी बातमी! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू राहणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला वैद्यकीय मदत जाहीर केली होती. यात मास्क, लस, चाचणी किट पुरवायचे होते. याचा इन्कार किम जोंग उन यांनी केला आहे. २.६ कोटी लोकसंख्येसह, देशातील आरोग्य सेवा ही जगातील सर्वात वाईट असल्याचे तज्ञांचे मत आहे. देशात हॉस्पिटल्स, स्पेशल केअर युनिट्स, औषधे, डायग्नोस्टिक किट्सची कमतरता आहे. परिस्थिती सुधारली नाही तर देशात सत्तांतरही होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.