Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ सीएनजीचीही दरवाढ! सीएनजी ८० रुपये किलो

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ काही दिवसांपासून थांबली असली तरी दीड महिन्यांपासून सीएनजीच्या दरातील वाढ कायम आहे. पुण्यात शनिवारपासून सीएनजीच्या दरात किलोमागे २.८० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात सीएनजीचा दर ८० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या दीड महिन्यात सीएनजीचे दर १८ रुपयांनी वाढले आहेत.

रस्ते बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्या; आमदार कोरोटेंची मंत्री सुभाष देसाईंकडे मागणी

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांत त्यात वाढ किंवा घट झालेली नाही. सध्या पुण्यात पेट्रोलचा दर १२० रुपये तर डिझेलचा दर १०२ रुपये आहे. आता सीएनजीची दरवाढ सुरू आहे. ५ एप्रिलला लगेचच त्यात वाढ होऊन तो ६८ रुपयांवर पोहोचला. आठवड्यानंतर लगेचच दरात वाढ झाली. १३ एप्रिलपासून शहरात सीएनजी ७३ रुपये किलो झाला होता. त्यात २० एप्रिलला २ रुपयांची वाढ होऊन दर ७५ रुपयांवर गेले. त्यानंतर आता त्यात पुन्हा २.८० रुपयांची वाढ झाली असून २१ मेपासून शहरात सीएनजीचा दर ८० रुपये किलो झाला आहे.

अबब! १.३ कोटी रुपयांना विकली ‘ही’ नोट; या नोटेत इतकं काय खास

शहरातील सर्व रिक्षा सध्या सीएनजीवर चालतात. पीएमपीच्या अनेक बस याच इंधनावर धावतात. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असल्याने अनेक खासगी गाड्याही गेल्या काही दिवसांत सीएनजीमध्ये बदलल्या आहेत. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची खरेदीही गेल्या काही वर्षांत वाढली आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसोबतच सीएनजीच्या दरातही वाढ होत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.